नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह चालविण्यासाठी संस्थांना प्रस्तावासाठी आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केंद्र पुरस्कृत मिशन शक्तीत सामर्थ्य या योजनेअंतर्गत  नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह चालविण्यासाठी सखी निवास घटक योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हयात एक सखी निवास भाडेतत्वावरील सुयोग्य इमारतीमध्ये कार्यरत करण्यासाठी संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार सखी निवास चालविणाऱ्या संस्थांना प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापनासाठी  अनुदान दिले जाणार आहे. कार्यान्विती करावयाची असल्याचे पत्राव्दारे सुचित करण्यात आले होते. यासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावासाठी पुन्हा २१ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक संस्थांनी  निकषाप्रमाणे त्यांचे परीपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करावेत. असे आवाहनही श्रीमती सोनगल यांनी केले आहे.

Protected Content