वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील ४ गुन्हेगार हद्दपार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चार गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे.

नशिराबाद आणि धरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (४२), टोळी सदस्य आरिफ शेख तस्लीम खान (२४), असलम खान अयाज खान (३०) सर्व रा. कुरेशी मोहल्ला ही टोळीवर नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, धरणगाव, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद  व चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.  त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

या सोबतच कासोदा पोलिस ठाण्यात अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता.एरंडोल) याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल असण्यासह दोन प्रतिबंधक कारवायादेखील करण्यात आल्या होत्या. तरीदेखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला देखील जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिले.

Protected Content