परिवर्तनच्या अमूर्ता प्रयोगाने जिंकली रसिकांची मने !

मुंबई प्रतिनिधी । जळगाव येथील परिवर्तन संस्थेने निर्मित केलेल्या अमूर्ता या कार्यक्रमाचा प्रयोग चित्रकार वसंत वानखेड़े यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित महोत्सवात सादर करण्यात आला असून याला रसिकांची पसंती मिळाली.

वसंत वानखेड़े फाउंडेशन मुंबई यांनी चित्रकार वसंत वानखेड़े यांच्या स्मृती प्रीत्यर्थ एक महोत्सव आयोजीत केला होता. या मध्ये परिवर्तन जळगाव निर्मित अमूर्ता हा कार्यक्रम सादर करण्यात आला. परिवर्तन निर्मित व शंभु पाटिल यांच्या संकल्पनेमधून साकारलेला अमूर्त शैलीचा शोध घेण्याचा कार्यक्रम मुम्बई मधील आर्टिस्ट सेंटर येथील सादर करण्यात आला. जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते व रंगकर्मी शंभु पाटिल यांनी जगामधील श्रेष्ठ चित्रकारांची चित्र व कवितेच्या प्रात्यक्षिका मधून अमूर्त या विषयाची मांडणी केली. भारतीय तत्वज्ञान व दर्शन , मराठी कवितेची परंपरा या मधून केलेली अमूर्ततेची कल्पना अत्यंत सुंदर पणे सादर करून उपस्थित रसिकांची मने या मैफिलिने जिंकली.

या कार्यक्रमात शंभू पाटील म्हणाले की, अमूर्त भारतीय माणसाला नवीन नाही , भारतीय तत्वज्ञान , साहित्य सतत अमूर्ततेची संकल्पना मांडत आहे. आधुनिक जगात पाश्‍चिमात्य चित्रकारांनी अमूर्तचित्र शैली विकसित केली व त्यांची सैद्धांतिक मांडणी केली. रोथा, पॉल क्ली, पिकासो, ह्या कलावंताच्या शोधामधून अमूर्त चित्र शैली पुढे आली . पण भारतीय तत्वज्ञान व आध्यात्माने अमूर्ततेची संकल्पना खुप आधीच मांडली आहे. चित्रकलेमध्ये ती ह्या १०० वर्षात आली. पाश्‍चिमात्य संकल्पनेला हे नवीन आहे पण भारतीय माणसाला ही सुपरिचित कल्पना असूनही, अजूनही अनेकांच्या मनात अमूर्त चित्रा विषयी अनेक गैरसमज आहेत. आपल्या तत्वज्ञानामधून , संत साहित्यामधून , आधुनिक कविते मधून अमूर्त ही संकल्पना इतकी सुपरिचित असताना आपण अमूर्ततते विषयी इतके अनभिज्ञ का आहोत ? असे प्रतिपादन त्यांनी केले.

अमूर्ता या प्रयोगाला ज्येष्ठ सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर , जेष्ठ पत्रकार विजय बाविस्कर , जेष्ठ अभिनेते नंदू माधव, नाटककार प्रा. डॉ महेश जोशी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते . ज्योति सावे व संजय सांवत यानी फाउंडेशनच्या वतीने अथितीचे स्वागत केले. अमूर्ताच्या यशस्वी प्रयोगासाठी राजू बाविस्कर, विकास मलारा , विजय जैन, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे व हर्षल पाटिल यांचे सहकार्य लाभले.

Add Comment

Protected Content