ट्रेंडींग

जळगाव ट्रेंडींग

पोलीस निरीक्षक पाडळे यांची घोड्यावरून मिरवणूक;सहकाऱ्यांकडून भावपूर्ण निरोप ( व्हिडीओ )

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. पाडळे यांची नुकतेच नाशिक ग्रामीण विभागात बदली झाली. शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. शहर पोलीस ठाण्यातून त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. एखादा पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याचे त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी ऋणानुबंध जुळतात. शहर पोलीस ठाण्यात अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून पाडळे हे रुजू झाले होते. कमी वेळात त्यांनी सर्वांवर आपली चांगली छाप पाडली. नुकतेच त्यांची नाशिक ग्रामीण परिक्षेत्रात बदली झाली. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता. यावेळी पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभागाकडून पाडळे यांचा पुष्पहार […]

जळगाव ट्रेंडींग

पु. ना. गाडगीळ कला दालनातील शिवउत्सव चित्र प्रदर्शनास प्रतिसाद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पु.ना. गाडगीळ कला दालनातील शिवउत्सव चित्र प्रदर्शनास रसिकांचा प्रतिसाद लाभला आहे. जळ्गाव शिवजयंती निमित्त स्थानिक युवा चित्रकारांनी काढलेल्या जनतेचा राजा शिवछत्रपती यांच्यावर काढलेल्या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न जळगावचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, माजी जिल्हाधिकारी तथा सचिव महसूल विभाग मंत्रालय किशोरराजे निंबाळकर, संगीताराजे निंबाळकर यांनी पु. ना. गाडगीळ कला दालनात केले. युवा चित्रकार योगेश सुतार यांच्या संकल्पने्नुसार जळगावातील ४१ युवा चित्रकारांनी शिवाजी महाराजांचे जलरंग, आईल, अ‍ॅक्रलीक, पेन्सील आदी माध्यमातून चित्र काढलेली आहेत. याप्रसंगी ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र भारंबे, वंदना पवार परमार, रुपाली सोनवणे, सुमेरसिंग चव्हाण, पुना गाडगीळचे व्यवस्थापक खेमराज, ललीत कला महाविद्यालयातील विद्यार्थी , पालकवर्ग आदी उपस्थीत होते. […]

जळगाव ट्रेंडींग

आतून आवाज आला तरच उद्योजक बना- किशोर ढाके (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कुणीही मारून मुटकून व्यापार वा उद्योगात यशस्वी होत नाही, तर यासाठी आतून आवाज येणे गरजेचे असते असे प्रतिपादन येतील सोयो सिस्टीमचे कार्यकारी संचालक तथा प्रतिथयश उद्योजक किशोर ढाके यांनी केले. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. लाईव्ह ट्रेंडस् न्यूज समाजातील विविध क्षेत्रांमधील यशस्वी मान्यवरांच्या वाटचालीचा आढावा आपल्यासमोर मांडणार आहोत. यात पहिल्यांदा सोयो सिस्टीमचे कार्यकारी संचालक किशोर ढाके यांच्याशी साधलेला संवाद आपल्याला सादर करत आहोत. किशोर ढाके हे मूळचे भालोद (ता. यावल) येथील रहिवासी. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. यानंतर त्यांनी मुंबई येथून इलेक्ट्रॉनिक्स या विषयात बी.टेक.ची पदवी संपादन केली. खरं तर शिक्षणानंतर बहुतांश जण […]

जळगाव ट्रेंडींग

आता मुंबईत भरीताची वांगी पहिल्यांदा शोधावी लागतील !-निंबाळकर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील कार्यकाळात येथील नागरिकांचा आपल्याला खूप स्नेह मिळाल्याचे सांगत आता मुंबईत भरीताची वांगी पहिल्यांदा शोधावी लागतील, अशा शब्दात माजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जळगाव आपल्या हृदयात कायम राहणार असल्याचे सांगितले. माजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे महसूल व वन विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी (मदत व पुनर्वसन) पदावर लवकरच रुजू होणार आहेत. यांनी पु.ना. गाडगीळ कलादालनातील कार्यक्रमात लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला विशेष मुलाखत दिली. यात ते म्हणाले की, जळगावातील दोन वर्षाचा काळ सुखद होता जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना केवळ एकाच गोष्टीवर भर न देता सर्वच विषयांवर भर देता आला. अतिक्रमण, महानगरपालिका, पाणी पुरवठा, मनरेगा आदी प्रश्‍न चांगल्या प्रकारे सोडवता आले. […]

जळगाव ट्रेंडींग व्यापार

जळगावात खाद्य क्रांती… झोमॅटोची एंट्री !

जळगाव प्रतिनिधी । अगदी आपल्या घरपोच हॉटेल्समधील खाद्यपदार्थ आणून देण्याची सेवा पुरवणार्‍या झोमॅटो कंपनीचे आजपासून जळगावात कार्यान्वयन सुरू झाले आहे. फुड इंडस्ट्रीत यामुळे नवीन अध्याय सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. झोमॅटो ही फुड डिलीव्हरीत अग्रेसर असणारी कंपनी आजपासून जळगावात कार्यरत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे १२० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ ग्राहकांना या सेवेच्या माध्यमातून आपल्या घरपोच मागविता येणार आहेत. झोमॅटोची स्वत:ची कोणतीही हॉटेल नसल्याची बाब येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र जळगावातील बहुतांश ख्यातप्राप्त हॉटेलमधील खाद्यपदार्थ हे संबंधीत कंपनी ग्राहकाला अगदी घरपोच पोहचवणार आहे. यासाठी युजरला याचे अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागणार आहे. हे अ‍ॅप आपण येथे […]

ट्रेंडींग

चित्रकार योगेश सुतार यांच्या सृजनाची भरारी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । ख्यातप्राप्त चित्रकार योगेश सुतार यांच्या कलाकृतींना जगभरातून कौतुकाची थाप मिळाली आहे. त्यांच्या वाटचालीचा आढावा ऐका खुद्द त्यांच्याकडूनच. चित्रकार योगेश सुतार हे मूळचे धरणगाव येथील रहिवासी होत. बालपणापासूनच त्यांचा पारंपरीक शिक्षणात अरूची असली तरी चित्रकलेची आवड होती. यामुळे त्यांनी कलेमध्येच करियर करण्याचा निर्धार केला. यात अनेक अडचणींवर मात करून त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात नावलौकीक कमावला आहे. देश-विदेशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने आयोजित होत असून याला रसिकांसह समिक्षकांचीही दाद मिळाली आहे. जळगाव येथील पु.ना. गाडगीळ कला दालनात योगेश सूतार यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. यानंतर ते आता येथे प्रत्येक रविवारी सायंकाळी चार वाजता लाईव्ह पोर्ट्रेट रेखाटत असतात. पहा:- योगेश […]

जळगाव ट्रेंडींग

लिनन क्लबमध्ये ट्रेंडींग फॅशनची वस्त्र-प्रावरणे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जी.एस. ग्राऊंड जवळील लिनन क्लब या अद्ययावत शो-रूममध्ये किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम वस्त्र-प्रावरणे उपलब्ध असून याबाबत संचालक अजित जैन यांनी माहिती दिली. लिनन क्लबचे संचालक अजित जैन यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजसोबत साधलेल्या संवादामध्ये आपल्या शोरूमबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, अद्ययावत दालनात आम्ही गत पाच वर्षांपासून जळगावकर ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहोत. यात सध्या प्रचलीत असणार्‍या विविध फॅशन्सला अनुकुल असणारी तसेच विविध वयोगटातील स्त्री-पुरूषांसाठी आमच्याकडे भरपूर व्हरायटीज उपलब्ध आहेत. यात रेडीमेड तसेच कापडाच्या स्वरूपातील वस्त्रे उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे लिननचा वापर करतांना याला अतिशय उत्तम प्रकारची शिलाई आवश्यक असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत, लिनन क्लबमध्ये […]

जळगाव ट्रेंडींग

पु. ना. गाडगीळ कला दालनात प्रा वंदना पवार यांचे स्त्री केंद्रीत चित्रप्रदर्शन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील पु.ना. गाडगीळ कलादालनात प्रा. वंदना परमार यांचे ज्योस्त्निका हे खास महिलांना समर्पित असणारे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रा. वंदना परमार या जळगावतील ललिल कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन संगीताराजे निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शमा सुबोध सराफ., डॉ श्रध्दा चांडक, उज्वला बेंडाळे, सीमा देशमुख, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थीत होते. वंदना पवार यांनी सर्व चित्र आईल कलर मध्ये अमुर्त शैलीत काढलेली असून प्रत्येक चित्रात त्यांनी श्रमजीवी कष्टकरी महिला तीचा जीवनक्रम, संघर्ष अग्रभागी ठेवलेला आहे. वंदना पवार यांनी इंद्प्रस्थ भारती, हंस आदी मासीकांचे मखपृष्ठ तसेच कथा व कवितांसाठी स्केचेस काढलेली आहेत. चित्रकलेसाठी […]

जळगाव ट्रेंडींग

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त एपीक चित्र प्रदर्शन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोकभाऊ जैन यांच्या ५६ व्या जन्म दिवसानिमित्त आजपासून शहरातील भाऊंच्या उद्यानात एपीक चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १४ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते १० या वेळात सर्वांसाठी खुले राहणार आहे. जैन उद्योग समूहातील २५ सहकार्‍यांनी वेगवेगळ्या वेळी मोबाईलद्वारे काढलेली आगळी-वेगळी छायाचित्रे उद्यानातील आर्ट गॅलरीतील या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जैन उद्योग समूहाचे कलावंत विकास मलारा यांच्या संकल्पनेतून अशोकभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी हे साकारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी अवश्य भेट देऊन या कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजक विकास मलारा यांनी केले आहे. पहा– विकास मलारा यांनी एपीक चित्र […]

जळगाव ट्रेंडींग

मनोमय इलेक्ट्रॉनिक्सचे चार मजली सुसज्ज दालन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात नवीपेठेत मनोमय इलेक्ट्रॉनिक्स या चार मजली अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणार्‍या दालनात विविध उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जळगावकरांच्या सेवेत ५ जानेवारी २०१८ रोजी मनोमय इलेक्ट्रॉनिक्स रूजू झाले होते. एक वर्षाच्या कालखंडात या दालनाला जळगावकर नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. यात टिव्ही, फ्रिज, साऊंड सिस्टीम्स आदींपासून ते विविध गृहोपयोगी उपकरणे उपलब्ध आहेत. यात सॅमसंग, सोनी, व्हर्लपुल, पॅनासोनिक, बॉश आदींसारख्या ख्यातप्राप्त कंपन्यांच्या उपकरणांचा समावेश आहे. हे दालन चार मजली असून येथे ग्राहकांना कोणतेही उपकरण खरेदी करण्यापूर्वी त्यांचा परिपूर्ण वापर जाणून घेता येतो. अर्थात, घरी उपकरण नेण्याआधी त्याचे सर्व फंक्शन्स जाणून घेता येतात. यामुळे ग्राहकाला आपण खरेदी […]