जी-२०’ अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत सागर कोळीचे यश !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी असलेल्या सागर कोळी या तरूणाने वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे.

भारत सरकारद्वारे संपूर्ण देशामध्ये ‘जी-२०’ परिषदे अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आकाशवाणी केंद्र जळगाव यांच्या मार्फत भ एम जे कॉलेज हॉल मध्ये वक्तृत्व स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

यात अमळनेर तालुक्यातील पाडळसरेचा सागर सुकदेव कोळी याने भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. त्याला स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर, आकाशवाणी केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर बोबडे सर,एम जे कॉलेज हिंदी विभागाचे प्राध्यापक विजय लोहार यांच्या हस्ते देण्यात आले.

या स्पर्धेसाठी नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन सागरला लाभले. सागर कोळी हा नेहरू युवा केंद्र युवा मंडळाचा सक्रिय सदस्य असून या सोबतच या आधी पण विविध भाषण स्पर्धा आणि काव्य वाचन स्पर्धेत सागरने यश मिळविले आहे. साहित्यिक क्षेत्रात नवोदित तरुण म्हणून त्याची ओळख जिल्ह्यात निर्माण होत आहे. या यशाबद्दल सागर कोळी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Protected Content

%d bloggers like this: