यावलमध्ये कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेला प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला यावल शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभला आहे.

यावल शहरात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या आदेशाने जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने संपुर्ण राज्यभरात काढण्यात येत असलेल्या जनसंवाद पदयात्रेस यावल शहरातुन सुरुवात करण्यात आली असुन ,या यात्रेस युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. यावल शहरात कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या जनसंवाद यात्रा दरम्यान आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला.

याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील सरकारच्या कार्यकाळात महागाईमुळे सर्वसामान्यांचे होत असलेले हाल, देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था आणी शेतकर्‍यांच्या समस्या, करोडो शिक्षीतांची वाढती बेरोजगारी यासह सर्व पातळीवर केन्द्र आणी राज्य शासन हे अपयशी ठरले आहे. या पार्श्‍वभूमिवर, जनतेने आगामी निवडणुकीत सत्ताधार्‍यांना धडा शिकवण्याचे आवाहन देखील आमदार चौधरी यांनी केले.

यावेळी कॉंग्रेस समितीचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील,निरीक्षक मुन्नवर खान , प्रदेश सरचिटणीस जलील पटेल, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हमीद काझी, महाराष्ट्र एमएसयुआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी,यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील,शहराध्यक्ष कदीर खान, तालुका खरेदी विक्री शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड,तुळशीराम तायडे,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,आशुतोष पवार, हाजी शब्बीर खान,माजी नगरसेवक मनोहर सोनवणे,समीर मोमीन,माजी नगरसेवक समीर खान,यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी,कॉंग्रेस अनुसुचित जाती विभागाचे यावल तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे,इम्रान पहेलवान, कॉंग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,सकलेन शेख, दहिगावचे प्रथम नागरिक सरपंच अजय अडकमोल,विक्की गजरे,टीनु सोनार,शरद पाटील अय्युब खान, रहेमान खाटीक,अश्फाक शाह,कलीम शेख,उस्मान खान,जावेद, शोएब खान यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content