पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शिबिर उत्साहात

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान लाभार्थी समस्या शिबिराचे आयोजन आज शुभ दिव्य लॉन्स वर घेण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला यावल नायब तहसीलदार संतोष विनंतें, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, संजय महाजन, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चंद्रशेखर चौधरी, पप्पू चौधरी, रवींद्र होले, निलेश चौधरी, तलाठी तेजस पाटील, मंडळ अधिकारी एम एच तडवी, तलाठी हेमा सांगोळे, महसूल सहाय्यक सुयोग पाटील, तलाठी स्मिता कोळी, कृषी सहाय्यक डी व्ही कठोके, कृषी अधिकारी सागर शिनारे, तलाठी मिलिंद कुरकुरे उपस्थित होते.

यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी शहरातील शेतकरी बांधवांचे नोलँड सेटिंग व गचई या तांत्रिक अडचण होती . ही अडचण तात्काळ यावल तहसीलदार यांनी सोडवली असून पंधरा दिवसानंतर गचई ही प्रोसेस झाल्यानंतर अडचण दूर होणार आहे. यानंतर शेतकरी बांधवांचे नाव सातबारा उतारा, बँक पासबुक वर आधार कार्डवर एकच असल्यास काही अडचण नाही. या तिन्ही गोष्टी पैकी एकाही ठिकाणी नावांमध्ये बदल असल्यास ती दुरुस्त करून घ्यावी. असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले. या शिबिरामध्ये २२२ शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. बर्‍याच दिवसांपासून असलेली समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने स्वतः उपस्थिती राहून सुट्टीच्या दिवशी सदरचे काम मार्गी लावल्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य उमलले.

या कार्यक्रमासाठी अंबिका उत्पादक दूध संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे सदरचे शिबिर शांततेत पार पडले. या शिबिर कार्यक्रमासाठी शुभ दिवे लॉन्स मोफत सेवा देण्यात आले. दरम्यान, या शिबिरामध्ये तीन ठिकाणी लॅपटॉप घेऊन स्नेहल फिरके, तलाठी मिलिंद कुरकुरे, शहरातील सेतू केंद्रातील बांधव व संजय राजपूत,ज्ञानेश्वर तायडे, तुषार जाधव यांनी कामकाज पाहिले.

Protected Content

%d bloggers like this: