फैजपूर येथे माजी आमदार चौधरी यांनी साधला नागरिकांशी संवाद

faijpur news 1

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२४) रोजी फैजपूर शहरात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शहरातील विविध भागांमध्ये भेट देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

आज सकाळी श्री. चौधरी यांनी शहरातील साने गुरुजी कॉलनी, आसाराम नगर व गजानन वाडी, विद्यानगर या भागांमध्ये नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या भागांपैकी शहर हद्दीबाहेर असलेल्या भागांमध्ये रस्ते, गटारी अशा अत्यावश्यक नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची व्यथा मांडली. यावेळी सानेगुरुजी नगरमध्ये शिरीष चौधरी यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, डॉ. गणेश चौधरी, रामाराव मोरे जिल्हा सरचिटणीस कांग्रेस, अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष शेखर तायडे, ‘अजावी’चे जिल्हा सचिव बबन तायडे व काँलनीतील नागरिक श्री. पवार, गोविंदा चौधरी, गणेश मोरे, फकीरा तडवी, हेमचंद्र कोलते, डी. एल. तायडे, बंटी आंबेकर आदी उपस्थित होते. आसाराम नगरमध्ये दि.पु. चौधरी, प्रशांत गाजरे, अशोक किरंगे, गणेश पाटील, त्र्यंबक वायकोळे, भुवन वायकोळे, श्री.जावळे आदी उपस्थित होते. तसेच गजानन वाडी येथे मनोहर नेमाडे, पंडित कोल्हे, लीलाधर फेगळे, श्री.अत्तरदे, हिरामण धांडे, विष्णू किरंगे, हे नागरिक उपस्थित होते.

Protected Content