फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जनतेने आपल्याला आजवर भरभरून प्रेम दिले असून याच्या ऋणातून उतराई होता येणार नसल्याचे भावपूर्ण प्रतिपादन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी काढले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ६५ व्या वाढदिवसाच्या औचीत्याने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रसंगी बोलत होते.
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अभिष्ठचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज, गादीपती सतपंथ संस्थान फैजपूर, परमपूज्य ह भ प दुर्गादास नेहते महाराज खिर्डीकर, परमपूज्य दिव्य चैतन्य महाराज वृंदावनधाम पाल, यांच्यासहित माजी आमदार रमेश दादा चौधरी, शेतकी संघ चेअरमन डॉ अमोल भिरुड, रवींद्र भादले संचालक धनाजी नाना चौधरी आश्रम शाळा सतरासेन, एस. पी. गणेशकर जिल्हा दिव्यांग समिती केंद्रप्रमुख, डॉ राजेंद्र पाटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रावेर, प्रभाकर आप्पा सोनवणे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष यावल, डॉ सुरेश पाटील, तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद शंकर वाघुळदे, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार आसाराम भंगाळे, सदस्य संजय काशिनाथ चौधरी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ आर. एल. चौधरी, प्राचार्य डॉ आर. वाय. चौधरी, माजी प्राचार्य डॉ व्ही. आर. पाटील, प्राचार्य डॉ राकेश चौधरी, प्राचार्य डॉ आर. बी. वाघुळदे, रियाज मेंबर, कलीम खान मण्यार खान, दारा मेंबर, केतन किरंगे, देवेंद्र साळी, राजू तडवी यांच्या सहित नगरसेवक, सरपंच, कार्यकर्ते आणि हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय चौधरी यांनी केले. त्यात त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचीत्याने दिव्यांग बंधू- भगिनींसाठी साहित्य वाटप तसेच समाजाच्या कल्यानार्थ विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे वचननामे यावर भाष्य केले. त्यांनी उपस्थित सर्व हितचिंतक, कार्यकर्ते व मधुस्नेह परिवार जनांचे आभार व्यक्त करीत श्री शिरीषदादांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम घडवून आणता आला याबद्दल आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी श्री एस पी गणेशकर जिल्हा दिव्यांग समिती केंद्रप्रमुख, डॉ राजेंद्र पाटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रावेर, श्री प्रभाकर आप्पा सोनवणे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष यावल, श्री रमेश दादा चौधरी माजी आमदार यांनी मनोगते व्यक्त करीत श्री शिरीषदादांना शुभेच्छा दिल्या व या पुढील काळात धनंजय चौधरी समृद्ध सेवेचा वारसा सक्षमतेने पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना आमदार शिरीषदादा चौधरी म्हणाले की, कर्मयोगी धनाजी नाना चौधरी व बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या समृद्ध सेवेचा वारसा पुढे चालवीत असताना शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील वाटचालीसाठी समाजातील प्रत्येक घटकांकडून मिळालेला पाठिंबा व ऋण कधीही न फेडता येण्याजोगे असून यापुढेही समाजाच्या भक्कम पाठिंब्यावर परिसरातील सर्व घटकांच्या उद्धारासाठी व विकासासाठी प्रयत्न करीत राहील. सोबतच जनतेने सकारात्मक कौल दिला तर या पुढील कारकीर्द चिरंजीव धनंजय चौधरी यांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत असेच पुढे चालू राहील.
परिसराला धनंजय चौधरी यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व देण्याचे सूचक संकेत आमदार शिरीषदादा चौधरी यांनी दिले. शैक्षणिक, सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात झोकून देऊन काम करेल असा विश्वास धनंजय चौधरी यांच्या बद्दल व्यक्त करीत त्यांच्या पाठीशी समाजाचा आशीर्वाद राहील असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी शिरीषदादा चौधरी यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कारकीर्दीतील चढ उतार उपस्थितांसमोर मांडून जनतेच्या आशीर्वादाने माझ्या हातून समाजकार्य घडल्याचा आनंद व्यक्त करीत समाजाच्या खंबीर पाठिंब्याबद्दल सदैव ऋणी असल्याचे मत व्यक्त केले.
संतगणांच्या अभिर्वचनातून परमपूज्य दिव्यचैतन्य महाराज वृंदावन धाम पाल व परमपूज्य दुर्गादास नेहेते महाराज खिर्डीकर यांनी आशीर्वाद पर मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षिय समारोपात महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरी जी महाराज यांनी रामायणातील राजा दशरथ यांच्या कथेचा आधार घेऊन योग्य वेळी राज्यकारभाराचे उत्तरदायित्व प्रभू श्रीरामांकडे देण्याचा निर्णय अचूक होता. यावरून वयाच्या ६५ वी साजरी करताना श्री शिरीषदादा चौधरी यांनी अचूक वेळ ओळखून चिरंजीव धनंजय चौधरी यांच्याकडे समाजसेवेचा वसा देऊ केल्याचा आनंद व्यक्त केला. यासोबत धनंजय चौधरी हे अत्यंत मितभाषी, मनमिळावू व समाजातील प्रत्येक घटकात मिसळणारे व्यक्तिमत्व असून येणार्या काळात समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहून सेवेची संधी देईल असा आशावाद व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मागील वर्षी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या अंतर्गत स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग बंधू-भगिनींना साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी दिव्यांगांना आवश्यक असणारे कृत्रिम हात, पाय व उपयोगी साहित्यांसहित तीन चाकी सायकली चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित दिव्यांग बंधूं कडून कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी यांनी मानले तर सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.