भुसावळच्या कोरोना रूग्णांच्या प्राणवायूसाठी कॅनडातून मदत !

भुसावळ Bhusawal प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने ऑक्सीजनचा अक्षरश: तुटवडा भासत असतांना आता भुसावळातील रूग्णांसाठी मूळचे भुसावळकर असणार्‍या कॅनडातील Canada मंगेश तुकाराम पाटील व त्यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता पाटील यांनी आज ऑक्सीजनच्या सिलेंडरसाठी मदत पाठविली आहे. भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांच्या आवाहनामुळे ही मदत मिळाल्याने आज भुसावळातील रूग्णांना ऑक्सीजन मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ Bhusawal शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सीजनवर होते. बुधवारी साठा संपल्याने भाजपचे डॉ. नी. तु. पाटील यांनी स्वखर्चातून मदत केली. यानंतर त्यांनी सोशल मिडीयावरुन ऑक्सीजन सिलेंडरसाठी मदतीचे आावहन केल्याने आता अनेक दात्यांचे हात पुढे आले आहेत. गरजेनुसार तसेच ऑक्सीजनच्या उपलब्धतेनुसार रुग्णांसाठी सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनची तिव्र टंचाई असल्याने बुधवारपासून ऑक्सीजनचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एजन्सींकडून पुरवठादाराला ऑक्सीजन न मिळाल्याने ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी भाजपच्या वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी सात हजार रुपये खर्च करुन दहा सिलेंडर दिले होते. यानंतर डॉ. पाटील यांनी सोशल मिडीयावर आवाहन देखील केले, यामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील बर्‍याच दात्यांनी सिलेंडर उपलब्ध करुन देण्यासाठी मदतीची तयारी दाखवली आहे. तर, आता रूग्णांसाठी विदेशातूनही मदतीचा हात पुढे आला आहे.

मूळचे भुसावळ शहरातील रहिवासी तथा सध्या कॅनडात Canada स्थानिक असलेले मंगेश तुकाराम पाटील व सौ. प्राजक्ता पाटील यांनी रूग्णांना मदतीचा हात दिला. त्यांनीही आपले बंधू डॉ. नी. तू. पाटील यांना पैसे पाठवले. या रक्कमेतून शुक्रवारी पाच सिलेंडरची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. यासोबतच शहरातील अनेक दानशुर व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. नी. तु. पाटील यांना संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र सध्या ऑक्सीजनच उपलब्ध नसल्याने स्थिती बिकट आहे. शहरातील दानशुरांनी आपल्या पातळीवर ऑक्सीजनचे सिलेंडर उपलब्ध करुन ते ग्रामिण रुग्णालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केले आहे.

रुग्णांचे प्राण वाचवावे

ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत आहेत. मात्र भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी यासाठी मोलाचा पुढाकार घेतल्याने पुरेशी नसली तरी बर्‍यापैकी समाधानकारक मदत मिळत आहे. ऑक्सीजनचे सिलेंडर मिळून रुग्णांचे प्रमाण वाचावे, भुसावळात उपचार मिळावे, रुग्णांना हलविण्याची वेळ येवू यासाठी आपले प्रयत्न आहेत, असेही डॉ. नी. तु. पाटील यांनी सांगितले.

स्थिती सुधारेल

या संदर्भात डॉ. नि. तु. पाटील म्हणाले की, सोशल मिडीयाव्दारे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाही प्रयत्न करीत आहे. मात्र सध्या सर्वत्र ऑक्सीजनची टंचाई असल्याने ही बिकट स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती लवकरच सुधारुन सर्व रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परततील, अशी परमेश्‍वराकडे प्रार्थना आहे.

Protected Content