सावित्रीमाई मंडळातर्फे महिला दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी । येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या इमारतीमध्ये सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती मिनाबाई महाजन यांच्याहस्ते माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शहीद झालेल्या जवानांना सामुहिक रित्या भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करून मंडळाच्या काही महिला भगीनीनी देशभक्तीपर गिते सादर केली. यानंतर शिक्षण विभागांकडून शिक्षणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल भगीनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगला सोनवणे व शिक्षिका सौ. ज्योती बाविस्कर तसेच अखिल समता परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सौ. दर्शना महाजन आणि मंडळाच्या माजी अध्यक्षा श्रीमती पार्वतीबाई चौधरी यांचा आदर्श समाज सेविका म्हणून शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. ज्योत्स्ना प्रमोद महाजन तर सूत्रसंचालन सौ. ज्योती गणेश महाजन यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. ज्योती धनंजय महाजन यांनी भुषविले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सौ. मोहिनी खैरनार, सौ. कल्पना महाजन, सौ. अनिता महाजन, सौ.अनिता पाटील, सौ. कविता महाजन, सौ. ललिता माळी, सौ. शुभांगी माळी, सौ. ज्योती महाजन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्येने समाजाच्या महिला भगीनी उपस्थित होत्या.

Add Comment

Protected Content