एमआरआय करताना फोटोसेशन चुकीचेच – टोपे

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – आतापर्यंत एमआरआय  किंवा सीटी स्कॅन करताना अशा प्रकारे फोटो सेशन करणे कोठेही पाहण्यात आलेले नाही. एमआरआय  करताना फोटोसेशन चुकीचेच असल्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

खा.नवनीत राणा यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान खा. राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयात एमआरआय करताना करण्यात आलेल्या फोटोसेशन वर आरोग्यमंत्री टोपे यांनी पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रम प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली.

लीलावती रुग्णालयात ज्या पद्धतीने फोटो काढण्यात आले ते रुग्णालयाच्या दृष्टीने फार चुकीचे आहे. तसेच रुग्णालयाला अंधारात ठेऊन फोटो सेशन करण्यात आले असेल तर ती चुकीची पद्धत आहे. कोणी आजारी असेल तर ते सार्वजनिकपणे इतरांना सांगण्याची गरज नाही. त्या व्यक्तीची तपासणी व्हायला हवी, आजारी असल्यास त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. उगाच टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करून त्यात राजकारण आणू नये. रुग्णालयाचे काही कायदेशीर नियम असतात त्याचे पालन झालेच पाहिजेत, असेही ना. टोपे म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!