सरकारकडून भाबडी अपेक्षा ठेवणेच चुकीचे- फडणवीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – आमदार, खासदारांना जेलमध्ये ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत राज्य सरकारची मजल गेली असून लांगूलचालन सुरु आहे. त्यामुळे या सरकारकडून भाबडी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे, या सरकारविरुद्ध आम्ही लढतो आहे, त्यांनीही लढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर व्यक्त केली आहे.

अनधिकृत भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीवरून वादंग निर्माण झाले आहे, मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना गुन्हेगाराप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या, कार्यकर्त्या विरोधात कारवाया  केल्या. परंतु मशिदीमधील शस्त्रास्त्रे किंवा अतिरेकी शोधण्याची कारवाई करण्यात आली नाही, यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला माझं एकच सांगणे असून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,  सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही.  असा इशारा पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना दिला होता.

राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ते पुढे म्हणाले कि, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई पॉवरफुल आहे. मंत्र्याचे वर्क फ्रॉम जेल सुरु आहे.आमदार खासदारांना १२ -१२ दिवस जेलमध्ये डांबले जात आहे. विशेषतः शरद पवारांच्या सल्ल्याची मुख्यमंत्र्यांना जास्त गरज असून राज्यातील बारा बलुतेदार शेतकरी, विद्यार्थी महिलांच्या अनेक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content