सावधान : आता टोमॅटो फिव्हरचा वाढलाय संसर्ग !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसतांनाच आता टोमॅटो फिव्हर या नवीन विकाराने डोके वर काढले असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

केरळमध्ये टोमॅटो फिव्हरचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. राज्यात आतापर्यंत ८२ मुलं टोमॅटो फिव्हरच्या विळख्यात सापडली आहेत. हा आजार पाच वर्षांखालील मुलांना होतो. सर्व ८२ रुग्ण कोल्लम शहरात आढळले आहेत. सध्या सर्व आजारी मुलांवर केरळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टोमॅटो फिव्हरला टोमॅटो फ्लू असेही म्हणतात. हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्याचा परिणाम ५ वर्षांखालील मुलांना होतो. बहुतेक बाधित मुलांमध्ये पुरळ उठणे, त्वचेवर जळजळ होणे, डिहायड्रेशन, त्वचेवर फोड येणे अशी लक्षणे दिसत आहेत. या व्हायरल इन्फेक्शनला टोमॅटो फ्लूचे नाव मिळाले आहे कारण हे फोड सामान्यतः गोलाकार आणि लाल रंगाचे असतात.या रोगाच्या ा मुख्य लक्षणांमध्ये डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे यांचा समावेश होतो. या संसर्गाने बाधित झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे लाल पुरळ दिसून येतात. यासोबतच खूप ताप येणं, सांधे सुजणे, थकवा येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसू शकतात तोंड कोरडे पडणे, हात, गुडघे यांचा रंग बदलणे हे देखील याची लक्षणे असून काहींना खूप तहानही लागू शकते.

दरम्यान, टोमॅटो फिव्हरपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स देखील दिलेल्या आहेत. यात प्रामुख्याने फोड व पुरळांना खाजवणे टाळणे, पुरेशी स्वच्छता राखणे, कोमट पाण्याने रूग्णाला आंघोळ करणे, संक्रमीत रूग्णापासून दुर राहणे आणि सकस आहार घेणे यांचा समावेश आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: