गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार यावल येथील कार्यकर्ता मेळावा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास महाराष्ट्राचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र राज्यातील नुकत्याच होवु घातलेल्या महापालिका, नगर परिषदा आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये पक्ष संघटन व पक्षाने राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य व राज्यासाठी केलेल्या विकासाची व समाजहिताच्या कार्याची जाणीव माहीतीद्वारे करून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन सर्व सामान्य माणसा पर्यंत पहोचवुन पक्षासाठी अनुकुल वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील आणी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड रविन्द्र भैय्या पाटील, जेडीसी बँकेच्या माजी अध्यक्ष तथा संचालिका रोहीणीताई खडसे यांच्या यावल, चोपडा, रावेर येथील माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषदचे सदस्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे.

या मेळाव्याच्या आयोजनासाठी यावल येथील पक्षाच्या संपर्फ कार्यालयात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, यावलचे माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम. बी.तडवी, तालुका सरचिटणीस अय्युब खान, पक्षाच्या ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, शहराध्य करीम मनियार, सईद शेख रशीद आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मेळाव्या विषयी मेळाव्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!