Home Cities पारोळा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी

0
77


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होऊन बंदिस्त व खुल्या तालिमेसाठी युवकांसह क्रीडा प्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी गेल्या ३ महिन्यांपुर्वी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना क्रीडा संकुलाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आदेश दिले होते.

या प्रस्तावाचा आमदार चिमणराव पाटील यांनी आवश्यक तो पाठपुरावा करून पारोळा व एरंडोल तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी ५ कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरी नंतर या कामाला तातडीने प्रशासकीय बाबी पुर्ण करून काम सुरू करण्याचा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या क्रिडा संकुलाचा कामाचा सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करून या कामाला अखेर आज सुरूवात करण्यात आली.

या कामाची जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पाहणी करून मैदानी खेळांसह इतर बंदिस्त खेळ सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना प्रथम प्राधान्याने पुर्ण करा, तसेच दैनंदिन वॉकिंग, योगा यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सुचना दिल्या. या संकुलाचा कामाला गतीने पूर्ण करून लवकरच हे क्रीडा संकुल क्रीडा प्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.


Protected Content

Play sound