चोरीच्या दुचाकीसह चोरट्याला अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बसस्थानक जवळील हॉटेल सुयोग येथून दुचाकी चोरी केलेल्या चोरट्यांला जिल्हापेठ पोलीसांनी गुरूवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पवन नगरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीससुत्रांनी दिलेली माहिती अशी की, २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल सुयोग जवळून एकाची (एमएच १९ एएम ९२५५) क्रमांकाची दुचाकी चोरी झाली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान ही दुचाकी चोरणारा चोरटा पवन नगरात राहत असल्याचे गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक जुबेर तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित मराठे यांना मिळाली. आणि प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना माहिती दिली. दरम्यान डॉ. जयस्वाल यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, मिलिंद सोनवणे, अमित मराठे यांनी कारवाई करत संशयित आरोपी संजय ओमकार गोंधळे वय-४७) रा. पवन नगर जळगाव याला अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली असून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार हे करीत आहे.

Protected Content