शहरात कोरोना रुग्ण शोध मोहीम सुरु (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.  लक्षणे असणारे रुग्ण  लवकर शोधून काढणे व तातडीने उपचार सुरु करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची परिस्थिती खालावणार नाही, पूर्वीपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी मृत्यू दुर्दैवी आहे. हे पूर्णपणे थांबविणे हा सर्वेक्षणामागील उद्देश आहे असे महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले .

जळगाव शहरातील हॉट स्पॉट ठरणाऱ्या परिसरात रुग्ण शोध मोहीमेस प्रारंभ करण्यात आला आहे. यात ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, चव येत नसेल, विशीष्ट गोष्टीचा वास येत नसेल अशी लक्षणे असतील तर ती आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगा, अशा रुग्णांची वैद्यकीय यंत्रणेकडून तपासणी करून त्यावर उपचार केला जाईल, याकडे दुर्लक्ष केले तर आपणास ते महागात पडणार आहे तरी सर्वांनी या मोहिमेस सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.          

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/275314420756221

 

Protected Content