शेतजमीन परत करा, अन्यथा कुटुंबासह इच्छामरणाची परवानगी द्या; भूमीहीन शेतकऱ्याचे उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । वाघुर धरणांतर्गत मौजे हिंगणे बुद्रुक ता. जामनेर शिवारात तापी पाटबंधारे विभागाने अधिग्रहित केलेली शेत जमीन परत द्यावी, किंवा त्याच किंमतीची जमीन इतर घेवून द्यावी अन्यथा कुटुंबासह इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी भूमिहीन शेतकरी अरूण भास्कर पाटील यांनी तापी पाटबंधारे विभागासमोर आज रविवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

 शेतकरी अरूण भास्कर पाटील यांनी राज्यपाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वाघुर धरणा अंतर्गत पुर्नवसीत वाढील गावठाण्यासाठी भुसंपादीत शेत जमीन गट नं.२२/१ शिवार हिंगणे बुद्रुक ता. जामनेर जि.जळगाव हे अरूण भास्कर पाटील यांच्या मालकीचे आहे. ही शेतजमीन भूसंपादन २००३ मध्ये अपर तापी प्रकल्प यांनी २६ मे २००० मध्ये संपादीत केली आहे. याला आता २२ वर्ष पुर्ण होत आहे. यासंदर्भात जिल्हा कोर्ट ने ५ मार्च २०१९ रोजी निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लागला. मात्र याचा मोबादला मिळाला नाही. म्हणून जामनेर येथे आमरण उपोषणाला सुरूवात केली. परंतू त्यावेळी वाघुर धरण विभागाचे अधिकारी यांनी मोबदला लवकर देण्यात येईल असे अश्वासन दिले होते. परंतू अद्यापपर्यंत शेतजमिनीचा मोबदला मिळाला नाही. आज कटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे शेतजमीन परत मिळावी अथवा शासनाने शासकीय दराप्रमाणे शेतजमीन त्याच शिवारामध्ये खरेदी करून द्यावी किंवा शेजारी आलेल्या शासकीय वनविभागाची शेतजमिन यावरील नियम व अटी शिथील करून मिळावी तसेच आजतागायात आमच्या झालेल्या अधिकचा सर्व खर्च व्याजासह मिळावा अन्यथा माझ्यासह सर्व कुटुंबियांना इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव येथील तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर भूमीहीन शेतकरी अरूण भास्कर पाटील यांनी आज ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून आमरण उपोषणाला बसले आहे. 

Protected Content