सावद्यात जल्लोषात बाप्पाचे आगमन

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवयुवक गणेश मंडळ, साळीबाग, सावदा यांच्या वतीने बाप्पांचे आगमन जल्लोषात करण्यात आले आहे.

मूर्तिकार अतूल वैद्य, बुऱ्हाणपूर यांनी सूर्यवंशी श्रीराम रूपात भव्य गणेशजींची मूर्ती साकारली. यावेळी माजी नगराध्यक्ष. राजेश गजाननराव वानखेडे व रेखा राजेश वानखेडे यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मंडळाच्या वतीने जमलेल्या सर्व गणपती भक्तांचे व जमलेल्या सर्व मायमाऊली महिलांचे, सहमित्र परिवाराचे मनापासून विषेश आभार मानण्यात आले .

Protected Content