बुलढाणा जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन उत्साहात

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन, रेडिओ सिल्वर सिटी (आवाज रजत नगरीचा) आज पासून समस्त खामगावकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय मान्यता प्राप्त आणि ज्ञानगंगा शिक्षण संस्था द्वारा संचालित रेडिओ सिल्व्हर सिटी हे रेडिओ स्टेशन खामगांवमध्ये सुरू झाले आहे. या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून कृषी, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना बाजारपेठेतील शेत मालाचे भाव, हवामानाचा अंदाज याची सुद्धा माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. साहित्यिक, कवी स्थानिक कलावंत यांच्या कलागुणांना सुद्धा हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे खामगावच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भर पडणार आहे. आणि मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम असणार आहे. रेडिओ सिल्वर सिटीचा उद्घाटन सोहळा आज नितीन देशमुख, आमदार बाळापुर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अकोला यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी अनिरुद्ध देशमुख अध्यक्ष ज्ञानगंगा शिक्षण संस्था, दीपक पटेल उपविभागीय कृषी अधिकारी खामगांव, किशोर भोसले अध्यक्ष प्रेस क्लब खामगाव, संतोष देशमुख माजी उपनगराध्यक्ष खामगाव, प्रा. अनिल अमलकर शिवसेना नेते खामगांव, आनंद बनचरे शिवसेना नेते बाळापुर, वैभव डवरे माजी उपनगराध्यक्ष खामगाव, यासह खामगाव मधील पत्रकार बांधव, डॉ. अभिलाश खंडारे, आणि डॉ. सोनाली देशमुख केंद्र प्रमुख रेडिओ सिल्व्हर सिटी, सोबतच रेडिओ सिल्व्हर सिटी चे सर्व आर. जे. जाहिरात प्रतिनिधी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि खामगाव मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे .अमर आणि आर.जे.सोनल यांनी केले तर आभार प्रदर्शन आर .जे. सरिता यांनी केले.

Protected Content