एमआयडीसीतून दोन मोबाईलसह रोकड लंपास; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातून एका ट्रकचालकाचे दोन मोबाईल आणि रोकड असा एकुण १९ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सोनू बालमुकुंद शर्मा (वय-२०) रा. देहरीया पोस्ट सोयत जि. आगर मालवा मध्यप्रदेश हे ट्रक चालक आहे. ३० ऑगस्ट रोजी ते कामाच्या निमित्ताने एमआयडीसीतील गुरूकृपा काटा येथे आले होते. त्याच ठिकाणी ट्रक लावून झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा १३ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल आणि ६ हजार रूपये रोकड असा एकुण १९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला. याप्रकरणी ट्रक चालक सोनू शर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चेतन सोनवणे करीत आहे. 

Protected Content