डॉ. आचार्य विद्यालयात रंगला ‘इंद्रधनुषी रिमझिम श्रावण’

जळगाव, प्रतिनिधी ।  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात इंद्रधनुषी रिमझिम श्रावण हा पाऊस गीतांचा श्रवणीय कार्यक्रम शाळेत घेण्यात आला.  विद्यार्थी व पालकांना ऑनलाईनच्या माध्यमातून हा कार्यक्रम दाखवण्यात आला.

 

आज दि.१ सप्टेंबर बुधवार रोजी ‘इंद्रधनुषी रिमझिम श्रावण’ या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गाणी गायली. यात इयत्ता  पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.नाच रे मोरा,श्रावण आला,रिमझिम पाऊस पडतो,शिवस्तोत्र इ गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. शालेय समिती प्रमुख हेमाताई अमळकर ,प्रा.विद्या व्यव्हारे व मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची या वेळी उपस्थिती होती.सूत्रसंचालन संध्या काटोले यांनी तर निवेदन लेखन प्रमोद इसे यांनी तर संगीत साथ व कार्यक्रमाचे नियोजन संगीत शिक्षक विजय पाटील व तुषार पुराणिक यांनी केली. याश्वितेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content