लवकरच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे करणार विस्तारीकरण – डॉ. पाटलांनी व्यक्त केला मानस

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खान्देश आणि विदर्भ व्यापून हजारो रुग्णांना उपचार देत जीवनदान देणार्‍या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे आगामी काळातही अशीच सेवा दिली जाणार असून त्यात विशेषत: तळागाळासह उच्चभ्रू रुग्णांवरही उपचारासाठी स्वतंत्र कार्डियाक सेंटरसह कॅन्सर सुपरस्पेशालिटीचीही सुविधा येथेच रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पूर्वी ७५० बेड्चे असलेले हे रुग्णालय आता ११०० बेड्सचे झाले असून कोवडिकाळापासून ४५० बेड्स अतिरिक्‍त आहे. आगामी काळातही खान्देश, विदर्भासह मध्यप्रदेशातील रुग्णांसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे लवकरच विस्तारीकरण करणार असल्याचा मानस गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला व्यक्त केला आहे.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा उद्या दि. २३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलेला आहे. वाढदिवसाच्या निमीत्ताने डॉ. उल्हास पाटील यांच्याशी आगामी वाटचालीबाबत चर्चा केली असता त्यांनी भविष्यातील प्रकल्पांविषयी माहिती दिली. पुढे डॉक्टर म्हणाले की, आई-वडील दोघेही शिक्षक होते. शिक्षकी पेशाच्या माध्यमातुन त्यांनी ज्ञानसेवा केली. सेवेचा हा वारसा निरंतर चालु रहावा म्हणुन मी वैद्यकीय क्षेत्र निवडले. जळगावात स्वत:च्या गोदावरी प्रसुतिगृहाच्या माध्यमातुन वैद्यकीय सेवेला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. गोरगरीब रूग्णांसाठी आपण काहीतरी करावे ही इच्छा सतत मनात होती. त्यामुळे गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातुन सन २००८ मध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचे रोपटे लावले. ५०० खाटांचे रूग्णालयाची झेप आता ११०० खाटांपर्यंत पोहोचली आहे, यात अनेकांचे मदतीचे हात लागले असून विश्वासूंनी दिवस-रात्र काम केले. या मेहनतीच्या जोरावरच आज रूग्णांना एमआरआय, सीटीस्कॅन, ब्लड बँक, हृदयालय, सोनोग्राफी, कलर डॉपलर, यासारख्या महत्वाच्या सुविधा सुरू करण्यात आला. सुविधा नुसत्याच सुरू नाही केल्या तर या सर्व तपासण्यांसाठी लागणारी उपकरणे ही अत्याधुनिक स्वरूपाची असल्यामुळे रूग्णांच्या आजाराचे अचुक निदान करणारे एकमेव रूग्णालय म्हणुन नावारूपाला आले आहे.

कार्डियाक सेंटरद्वारे जीवनदान 

खान्देशसह विदर्भातील हृदयविकाराच्या रुग्णांना एन्जीओप्लास्टी, पेसमेकर, बायपाससाठी मुंबई, पुणे येथे जावे लागत होेते. मात्र गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने अद्यावत यंत्रणा, तंत्रज्ञान उपलब्ध करुन स्वतंत्र कार्डियाक सेंटर सुरु केले असून येथे येणार्‍या रुग्णांना जीवनदान दिले जाते. गेल्या वर्षभरात २ हजार ४०० टू डी इको, १ हजार ४४० एन्जीओग्राफी तर ५६९ हून अधिक एन्जीओप्लास्टी करण्यात आल्यात. या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आल्या आहेत. रुग्णसेवेसाठी बंगळूरु आणि मुंबई येथील निष्णात कार्डियोलॉजिस्ट २४ तास उपलब्ध असतात.

सुपरस्पेशालिटी कॅन्सर सेंटर 

कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णांना उपचारासाठी मेट्रोसिटीमध्ये जाणे जिकीरीचे होते. त्यादृष्टीने रुग्णालयातच कॅन्सर तज्ञांची नियुक्‍ती करुन रुग्णांना उपचाराची सुविधा सुरु केली आहे. सद्यस्थीतीला रुग्णालयात तीन कॅन्सर तज्ञ सेवा देत आहे. आगामी  जळगाव आणि भुसावळ या दोन महत्वांच्या ठिकाणी २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी कॅन्सर सेंटर कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

Protected Content