अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारिणी घोषीत (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघांची जिल्हा कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, चिटणीस प्रमोद जाधव, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

 

यावेळी जिल्हा अध्यक्षपदी प्रा.मनोज पाटील, संपर्क प्रमुखपदी सुदर्शन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष चंदन पाटील, उपाध्यक्ष अतुल सोनवणे, उपाध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस दिपक पाटील, जिल्हा संघटक गोपाल पाटील, युवक अध्यक्ष शुभम पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मंगेश पाटील, युवक उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, युवक सरचिटणीस पंजाब देशमुख, महानगर अध्यक्ष जयेश पाटील, महानगर उपाध्यक्ष विजय बांदल, महानगर युवक अध्यक्ष प्रदीप पाटील, महानगर युवक उपाध्यक्ष पंकज पाटील व तसेच जिल्हा भरातील सर्व तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांक सावंत यांनी केले. त्यात संघटने विषयी माहिती, ध्येय, धोरणं, बैठकीचे उद्दीष्टे स्पष्ट करण्यात आली. संघटनेची पुढील वाटचाल या विषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात प्रा.मनोज पाटील यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचे नियुक्तीबद्दल आभार मानले. तसेच जिल्हाभरात मराठा महासंघाच्या गाव तेथे शाखा, युवकांचे संघटन व अनेक सामाजिक उपक्रम भविष्यात करण्याविषयी चर्चा केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश बाविस्कर सर यांनी केले. या जिल्हा बैठकीसाठी जिल्हा भरातील नवनियुक्त पदाधिकारी रामकृष्ण सनेर, धिरज पाटील, विश्वजीत पाटील, भुषण चौधरी, राकेश निकम, संदिप वाघ, किशोर पाटील, किरण पाटील, कल्पेश पाटील, दिपक पाटील, देवकांत पाटील, भिमराज पाटील, कैलास पाटील व तसेच जिल्हा भरातील पदाधिकारी हजर होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2905546396334885

 

Protected Content