राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार – जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सर्व जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार आहे. तालुकाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवार असणाऱ्या गाव पातळीवर सक्षम उमेदवारांचा सर्वे करून तशी शिफारस जिल्हास्तरावर पाठवावी आम्ही त्यांनाच उमेदवारी देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी केली.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर पालिका निवडणुक संदर्भात इच्छुक उमेदवारांची बैठक कृषी उपन्न बाजार समिती संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्षांनी सांगितले की आगामी निवडणुकीत रावेर तालुक्यातील इच्छुक असणाऱ्याची नावे जिल्हास्तरावरुन परस्पर घोषीत करून नका प्रोर्टोकॉल नुसार तालुकास्तरावरील राष्ट्रवादीच्या पदाधीका-यांना विस्वासात घेण्याची विनंती तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केली.

बैठकीत वाघोड गणाचे इच्छुक उमेदवार गणेश महाजन यांनी भाजपावर चांगलाच प्रहार केला.निधी वाटप तसेच शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरण भाजपाच्या कार्यकाळात झाला आहे. यामुळे रावेर तालुक्याचे नाव पूर्ण बदनाम झाल आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला घेरण्यासाठी हाच मुद्दा घेऊन सर्वांनी जनते समोर जावे याचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला फायदा होणार असल्याचे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केला आहे.

बैठकीला यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील माजी आमदार अरुण
पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, रमेश पाटील, सुनिल कोंडे, दिपक पाटील, अटवाडा सरपंच गणेश महाजन, मायाबाई बा-हे, किशोर राणे, मंदार पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, सोपान पाटील, प्रकाश पाटील, योगिता वानखेडे, पंकज वाघ, गोटू शेट, सचिन पाटील, राजेश वानखेडे, पकंज यवेले, काझी आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content