किनगाव इंग्लिश स्कूल येथे लिड अभ्यासक्रम शिक्षण प्रणाली सुरू

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव ते डोणगाव मार्गावर असलेल्या इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे लिड आभ्यासक्रम शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली असुन शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अत्याधुनीक बदलाबरोबरच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही अद्यावत शिक्षणाची संधी मिळावी यासाठी इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन विजयकुमार पाटील, सचिव मनिष पाटील व व्यवस्थापक पुनम पाटील यांनी लिड एज्युकेशन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

परीसरात लिड एज्युकेशन शिक्षण प्रणाली सुरू करणारी किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल ही पहिलीच शाळा आहे लिड आभ्यासक्रमाअंतर्गत इंग्लिश मेडीयम स्कुलच्या १० वर्गामध्ये एकुण १० टीव्ही आणि इतर वर्गामध्ये एक्स्ट्रा मार्क्सचे ५ युनिट बसविण्यात आलेले आहेत. लिड या अभ्यासक्रमाअंतर्गत शिक्षकांना प्रत्यकी टॅब देऊन प्रथम शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्याद्वारे अध्यापनाचे काम होत आहे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धात्मक जगात शैक्षणीक प्रगती करू शकले पाहीजेत व त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान मिळावे हा या लिड अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.लिड शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना इंग्लिश स्कुलचे प्राचार्य अशोक पाटील, उप-प्राचार्य राजश्री अहिरराव, हर्षल मोरे, योगीता बिहारी, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक एम.तायडे, पुजा डी.शिरोडे, तुषार धांडे, नूतन देशमुख, सृष्टी नरवाडे, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे यांच्यासह आदि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.