Home Cities जळगाव १६ जूनपासून दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा; जिल्ह्यात ५,६३३ विद्यार्थी देणार परीक्षा

१६ जूनपासून दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा; जिल्ह्यात ५,६३३ विद्यार्थी देणार परीक्षा

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२६ कालावधीत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेतला.

दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान तर बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित ठेवणे, वीजपुरवठा अखंडित राहील याची काळजी घेणे तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात बारावीसाठी ८ परीक्षा केंद्रे व दहावीसाठी १४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी २,९०० विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी २,७३३ विद्यार्थी सहभागी होणार असून, एकूण ५,६३३ विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जळगाव जिल्ह्यातील कोणतेही परीक्षा केंद्र उपद्रवी घोषित केलेले नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीस शिक्षण, पोलीस, महावितरण तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound