Home Cities भुसावळ भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात

भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात

0
104


tapti school

भुसावळ प्रतिनिधी । येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आज दि. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीसह शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतून ढोल ताशाच्या गजरात शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांनी शाळेतील शिक्षकांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या कटलर यांनी द्वीप प्रज्वलन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांचे आभार मानून शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी ड्रामा व नृत्य सादर केले. त्यानंतर शाळेत शिक्षकांना व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या परिसरात सजावटीसह रांगोळ्या काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सात्विक इंगळे आणि प्रिया नायर यांनी केले. तर आभार भारती मेढे यांनी मानले.


Protected Content

Play sound