चुंचाळे येथील रस्ता दुरूस्तीच्या कामाला मंजूरी; भिमआर्मीच्या आंदोलनाला यश (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेशवर महामार्गावरील चुंचाळे फाट्यावर भिम आर्मीने रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत, जिल्हा परिषद प्रशासनाने रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १७ लाख रूपयांची निधी मंजूर केला आहे. काही दिवसातच कामाला सुरूवात होईल असे आश्वासन जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील यांनी सांगितले.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातीत बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर राज्य मार्गाला जोडुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या ३ किलोमिटर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.  या मार्गावरून पादचारी असो की वाहनधारक असो या सर्वांना जातांना तारेवरची कसरत करावी लागत होती. वाहनधारकांना अनेक अडचणी प्रसंगी अपघात  व वेदनांना सामोरे जावे लागत असल्याने गावातील ग्रामस्थ मंडळीने लोकप्रतिनिधींना या रस्त्या संदर्भातील जाणीव देखील करून दिली होती. मात्र आश्वासना शिवाय काहीच चुंचाळे वासीयांच्या पदरात पडत होते. अखेर चुंचाळे गावातील राहणारे भिमआर्मी या संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदाशिव यांनी या मार्गाबद्दल पाठपुरावा केला. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे फाट्यावर राज्य मार्गावर सुमारे ५o मिनिटांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भिमआर्मीचे राज्य प्रवक्ता रमांकांत तायडे, तालुकाध्यक्ष हेमराज तायडे, तालुका उपप्रमुख आकाश बिऱ्हाडे, सत्यवान तायडे, सचिन वानखेडे, भैय्या तडवी, सचिन पारधे, पंकड डांबरे, चंदु पारधे यांच्या शिवाय गावातील काही सुज्ञ ग्रामस्थांने देखील यात आपला सहभाग नोंदवला. यावेळी ५० मिनिटांपर्यंत झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने शेकडो वाहने ही राज्य मार्गावरील रस्त्याच्या दोघ बाजुला थांबली होती , या आंदोलना प्रसंगी पोलीसांनी आपला बंदोबस्त चोख बजावला.

 

Protected Content