राज्य सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल – फडणवीस

मुंबई । राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,’ असं फडणवीस म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. अतिशय चुरशीच्या लढतीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) बिहारमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. या निवडणुकीत भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. त्यात फडणवीस यशस्वी ठरले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाष्य केलं.

फडणवीस यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल वेगळी भूमिका मांडली. ‘आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,’ असं फडणवीस म्हणाले.

प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. बिहारमधील मतदार अतिशय प्रगल्भ आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. कोरोना संकट काळात काही सरकारं केवळ टीका करत होती. त्यावेळी मोदींनी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Protected Content