चाळीसगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मदत कार्य

चाळीसगाव प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आजपासून मदतकार्य सुरू केले असून यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकार्‍यांनी आज सहभाग घेतला.

काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आता चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील पूराने बाधीत गावांमध्ये मदतकार्य सुरू झाले आहे. शहरात आज सकाळपासूनच शासकीय आणि खासगी पातळीवर सफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी एनसीसी पथकानेही पुढाकार घेत आपले योगदान दिले असून विविध संघटनाही यात सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींंद्रभैय्या पाटील यांनी आज नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी माजी आमदार राजीवदादा देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, नगरसेवक रामचंद्र जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश याप्रसंगी देण्यात आलेत.

Protected Content