अमळनेर येथे आशा दिनाचा कार्यक्रम उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) आशा सेविका या आरोग्य विभागाच्या ग्रामिण भागातील प्रत्येक लाभार्याशी जोडण्याचा पाया असून आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य योजनांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी त्यांची मोलाची मदत होत आहे. असे प्रतिपादन आ. स्मिताताई पाटील यांनी केले. तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने नुकतेच आशा दिनाचे आयोजन शहरातील मंगळग्रह मंदीर येथे करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी आशा स्वयंसेविकांचा गुणगौरवही करण्यात आला.

मागील पाच ते सहा वर्षात एकही माता मृत्यू अमळनेर तालुक्यात झाला नसून , बाळ मृत्यूचे प्रमाणही महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी असून १००० बालकांमागे १० ते ११ एवढेच आहे. हे कार्य निश्चितच आशा स्वयंसेविकांनी शासनाच्या आरोग्य सेवा गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यात महत्वाची भूमिका बजावल्याने शक्य झाले आहे. १०० टक्के प्रसुती हया दवाखान्यात झाल्या आहेत. शासनाच्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आशा कार्यकर्तीमुळे वेळेत व अपेक्षित देणे शक्य झाले आहे. हा लाभ डी.बी.टी.(ऑनलाईन) व्दारे देण्यात येत असल्याने सर्व लाभार्थ्यानी आधारकार्ड व बैंक खाते काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार स्मिता वाघ यांनी तालुक्यात स्वयंसेविकांनी केलेल्या कामाबददल व आरोग्य सर्व आशा सेवेत काम करणारे वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्याचे कौतुक केले. तसेच स्त्री ही पुरुषांच्या बाबतीत कोणत्याच कामात कमी नाही. संसाराची जबाबदारी स्वतःच्या खांदयावर कुठलेही मानसिक दडपण न घेता व व्यसनाधीन न होता प्रभावीपणे कार्य करत असते, असे विचार व्यक्त केले. आ. शिरिष चौधरी यांनी सुध्दा आशा स्वंयसेविका आरोग्यदुतांचे काम प्रभावीपणे करित आहेत . तसेच आशा दिवसाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तीने व प्रभावीपणे राबविल्याबद्दल कौतुक केले. यावेळी दोन्ही आमदारांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांचा विविध योजनांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या आशा स्वयंसेविकांचा प्रमाणपत्र व गुलागपुष्प देवून गौरव करण्यात आला.

यावेळी रांगोळी, काव्य वाचन, गायन, निबंध, सामान्यज्ञान यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांत यशस्वी झालेल्या आशा स्वयंसेविकांनाही प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. दोन्ही आमदारांनी आशा स्वयंसेविकांना दैनंदिन कामकाजात येणाच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू व भक्कमपणे पाठीशी उभे राहू, तसेच आशा स्वयंसेविकांना कायमस्वरुपी मानधन किमान रु.८००० व एसटी मोफत सवलतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस. पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य मिनाताई पाटील व माजी पं स सदस्य संदेश पाटील,माजी उपसभापती श्याम अहीरे, नगरसेवक प्रविण पाठक, माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील व इतर पदाधिकारी तसेच गटविकास अधिकारी अजय कुमार नष्टे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व प्रा.आ.केंद्रांचे वैदयकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आशा दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. निलिमा देशमुख यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत कलकर्णी यांनी मानले.

Add Comment

Protected Content