सोहनलाल जैन यांनी हमालांसोबत वाढदिवस साजरा करून समाजाला दिला आदर्श

शेंदूर्णी प्रतिनिधी । शहरातील सोहनलाल जैन यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने कुठलेही सेलिब्रेशन न करता गावातील हमाल बांधवांसोबत साजरा केला.

माणसाच्या जीवनात वाढदिवसाचे महत्त्व काही औरच वाढदिवस हा परिवार किंवा जास्तीतजास्त मित्राच्या उपस्थितीत साजरे करण्यावर सर्वांचा भर असतो त्यासाठी प्रसंगी मोठे सेलिब्रेशन व  हॉटेलमध्ये शानदार पार्टीचे आयोजन केले जाते व खूप खर्च केला जातो वाढदिवसाचं स्वरूप हे काहींसाठी शक्ती प्रदर्शन तर काहींसाठी श्रीमंती दर्शवणारे असतं परंतु सोहनलाल जैन यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने कुठलेही सेलिब्रेशन न करता गावातील हमाल बांधवांसोबत साजरा केला. यावेळी गावातील ६० ते ७० हमालांची उपस्थिती होती. त्यासर्वाना हमलांची निशाणी मोठा लाल रुमाल व ब्लॅंकेट देऊन हमालांना केक भरवून सत्कार करण्यात आला. येथिल हमाल बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा वेगळ्या पद्धतीने साजरा झालेल्या वाढदिवसामुळे हमाल बांधवांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य अनमोल होते.  त्यातून मिळालेला आनंद परमोच्च असल्याचे सोहनलाल जैन सांगितले यावेळी मित्र परिवाराची उपस्थिती होती.

Protected Content