राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हॉकी असोसिएशन जळगाव व गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव व जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

जीवन गौरव पुरस्कार गणपत पोळ, विष्णू भंगाळे, राधेश्याम कोगटा, डॉ. प्रदीप तळवेलकर, डॉ. किशोर पाठक, मिर्झा इक्बाल बेग यांना देवून सन्मानित करण्यात आले. तर जिह्यातील क्रीडा शिक्षकांना विशेष क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यात वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, खासगी इंग्लिश मेडियम स्कूल या क्षेत्रातील ५० क्रीडा शिक्षकांना विशेष क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.  यावेळी  डॉ. केतकी पाटील यांनी त्यांना खेळात करिअर करता न आल्याने खंत व्यक्त करत आयुष्य जागवण्याचे शिक्षण हे खेळातून मिळत असते असे स्पष्ट केले. प्रत्येक खेळात हिरा निवडण्याचे कसब हे शिक्षकांमध्ये असते. शिक्षकांच्या या प्रयत्नांना शासकीय अधिकारी व राजकीय व्यक्तींनी योग्य ती साथ दिली तर अधिक अधिक पदके आणू असा आशावाद व्यक्त करत सत्कार्थीच्या कार्याचा गौरव केला.  अध्यक्षीय भाषणात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडा शिक्षकांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला. क्रीडा क्षेत्र हे आनंद देणारे क्षेत्र आहे. यात जात पात धर्म याला कुठेही थारा दिला जात नाही. जगण्याची कला क्रीडा क्षेत्र शिकवीत असते असे कौतुक केले.  याप्रसंगी  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी  प्रा. डॉ. दिनेश पाटील, विविध खेळ संघटनाचे पदाधिकारी विष्णू भंगाळे,  जिल्हा क्रीडा अधिकारी  मिलिंद दीक्षित  आदी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/275053414080939

 

Protected Content