यावल येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांनी घेतली कार्यकर्ता संवाद भेट

यावल प्रतिनिधी । राज्यात नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक विनय भोईटे यांनी आज रविवार २९ ऑगस्ट रोजी यावल येथे कार्यकर्त्यांची भेट घेवून संवाद साधला.

भोईटे हे यावल तालुक्यातीत पक्षाच्या कार्यकर्ता  संवाद भेट घेण्यासाठी यावल येथे आज आले होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष जनहीत चेतन अढळकर यांनी निरिक्षक विनय भोइटे यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयात भोइटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद भेट घेतली. जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पातळीवरील संघटनात्मक बांधणी पक्षाच्या माध्यमातुन सक्रीय पदाधिकारी  आणि कार्यकर्ते हे करीत असलेल्या विविध जनहित आणी समाजहितांच्या मुद्दांवर चर्चा करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. 

याप्रसंगी बैठकीस उपस्थित सक्रिय कार्यकर्ते उपाध्यक्ष श्याम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, अजय तायडे, विभाग अध्यक्ष अबिद कच्ची, गौरव कोळी, राज शिर्के, विपुल येवले, प्रतिक येवले, अनिल सपकाळे आदी उपस्थित होते.

Protected Content