फैजपूर येथे फार्मसी महाविद्यालयात रानभाज्यांचे खाद्य पदार्थ प्रदर्शन (व्हिडीओ)

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर येथील फार्मसी महाविद्यालयात सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्यावतीने आदीवासी महिलांच्या बचत गटांचा रानभाज्यांचे खाद्य पदार्थ याचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रामे उद्घाटन डॉ. अरूणा चौधरी यांच्याहस्ते आज रविवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. 

यावेळी धनंजय चौधरी, लिलाधर शेट, अमित पाटील, महेश महाजन, डॅा. धीरज नेहते, एस.के.चौधरी, एम.टी. फिरके, व्ही.आर.पाटील, के.आर. चौधरी, पी.आर. चौधरी, विलास चौधरी, प्रतिभा बोरोले, नगरसेवक बापू वाघूळदे, प्रभात चौधरी, तुकाराम बोरोले, नरेंद्र नारखेडे, प्राचार्य व्ही.आर. पाटील, उपप्राचार्य आर. एल. चौधरी, पी.एच.राणे, जी.पी.पाटील, सुधाकर झोपे आदी उपस्थित होते. 

यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांचे आहार विषयक महत्व विषद केले. या प्रदर्शनात गारखेडा येथील लक्ष्मी महिला बचत गट, आशा बचत गट, लक्ष्मी बचत गट, उमेद महिला बचत गट, गणेश महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट आदींनी सहभाग घेतला. यात आंबाडीची भाजी, लाल मिरचीची चटणी, बांबूच्या कंदाची भाजी, राजगीरा पानांची भाजी, देशी मक्याचे भाजलेले कणीस, कर्टूल्याची भाजी, मक्याची भाकर, ज्वारीची भाकर, पोळ्या, कळणा भाकर, बाजरी भाकर, भरीत आदी भाजींचा समावेश होता. 

यावेळी माजी आमदार अरूण पाटील, डॉ. एस.डी.चौधरी, सुनिल कोंडे, प्रल्हाद बोंडे, हरीष गणवाणी यांनी भेट देवून पदार्थांची खरेदी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, डॉ. धिरज नेहते, शरद वाणी, नारवाडे सर आदिंनी परिश्रम घेतले.

 

Protected Content