आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे मुनव्वर राणा यांच्या पुतळ्याचे दहन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । देशातील प्रसिध्द उर्दू शायर मुनव्वर राणा याने महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत महर्षीची तुलना तालिबान्यांशी केली आहे. याच्या निषेधार्थ वाल्मिक नगरात आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील प्रसिध्द उर्दू शायर मुनव्वर राणा याने महर्षी वाल्मिक ऋषी यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महर्षी वाल्मिकी यांना दरोडेखोर संबोधत त्यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. असे आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आहे. आजवर देशवासियांनी मुनव्वर राणा याला डोक्यावर घेतले तेच राणा आता हिंदू धर्माविरूध्द गरळ ओकत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिकता व एकात्मता भंग होण्याची शक्यता आहे. यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून वाल्मिक नगरात कोळी समाज बांधवांतर्फे सायंकाळी साडेचार वाजता प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. यावेळी माजी महापौर भारती सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, दत्तू कोळी, किशोर बाविस्कर, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे मोहन शंकपाळ आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/818824765485705

 

Protected Content