कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर फैजपूरात तातडीची बैठक

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रभावामुळे आज (दि.26) रोजी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत फैजपूर नगरपरिषदेच्या सभागृहात  तातडीची बैठक घेण्यात आली. 

सदर बैठकीसाठी प्रांताधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, फैजपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा महानंदा टेकाम, API प्रकाश वानखडे , मुख्याधिकारी किशोर चव्हाण व होले, सन्माननीय नगरसेवक मिलिंद वाघुळदे, कलीम मण्यार, इरफान मेंबर, अविद मलक चंद्रशेखर चौधरी रवी होले शाहबाज खान, केतन किरंगे व इतर समाजसेवक उपस्थित होते.

सदर बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.  उदयापासून फैजपूर शहरातील सर्वच दुकाने (मेडिकल सोडून ) सायंकाळी 7 वाजता बंद होतील. ज्या दुकानांत विनामास्क दुकानदार, त्यांचे मदतनीस  अथवा ग्राहक असतील ती दुकाने काही दिवसांसाठी बंद करण्यात येतील.

रोगाचा प्रसार थांबावा व रुग्णाचे विलगीकरण करून रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी टेस्टिंग ची संख्या वाढवण्याकरिता  फैजपूर नगरपरिषदेचे सन्माननीय नगरसेवक यांनी आपल्या प्रभागात जनजागृती व नागरिकांचे संबोधन करणेकरीता पुर्ण सहकार्य देण्याचे ठरविले आहे.

Covid -19 चे लक्षणे आढळून आल्यास तात्काळ टेस्टिंग करून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

Protected Content