भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तिरंगा बाईक रॅली संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहनानुसार भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तालुक्याच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा जळगाव तालुक्याच्या वतीने उमा महेश्वर मंदिर उमाळे ते श्री गणपती मंदिर तरसोद या दरम्यान तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा मार्ग उमाळा,  देव्हारी, धानवड, चिंचोली, कुसुंबा, रायपूर, नशिराबाद, तरसोद असा  होता.  सकाळी पावसात निघालेल्या या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.  भारत माता की जय,  वंदे मातरम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू हो, हर घर तिरंगा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख लालचंद पाटील, माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन पवार, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, नशिराबाद या मोर्चा शहराध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीचा समारोप भाजपा ज्येष्ठ नेते प्रभाकर पवार, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा चिटणीस राजुभाऊ सोनवणे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती मनोहर पाटील, नशिराबाद शहराध्यक्ष बापू बोढरे, तालुका सरचिटणीस संदीप पाटील, सुनील लाड, तालुका उपाध्यक्ष रघुभाऊ चव्हाण, भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष विलास घुगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  यशस्वीतेसाठी अभियान संयोजक ललित बऱ्हाटे, तालुका सरचिटणीस सुदाम राजपूत, भूषण पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष कुंदन पाटील, युवा मोर्चा तालुका चिटणीस योगेश पाटील, युवा मोर्चा नशिराबाद शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील, महेश पाटील, समाधान सोनवणे, गुंजन पाटील, शुभम पाटील आदींनी कामकाज पहिले.

Protected Content