माणुसकी ग्रुपतर्फे आर्मीमध्ये रुजू झालेल्या दोघांचा सत्कार

पहूर. ता जामनेर, प्रतिनिधी । माणुसकी ग्रुप लोहारा तर्फे आर्मी मध्ये रुजू झाल्याबद्दल दोघा तरुणांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

लोहार येथील माणुसकी ग्रुपतर्फे आर्मी मध्ये रुजु झालेल्या सौरभ गजानन शेळके व निलेश संजय शेवाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी या दोन्ही तरूणांनांचे अभिनंदन केले. आर्मीत रुजु झालेल्या तरुणांनी आपले मनोगत व्यक्त केले व देशाच्या सेवेसाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू असे सांगितले. हा सत्कार समारंभ पाहून आम्ही भारावून गेलो. आम्ही आमच्या गावाला ,मित्रांना थोडे आई वडिलांना मुकणार आहे अशी भावनिक विचार सुद्धा व्यक्त केले. या उपक्रमामुळे गावातील तरुणांचा उत्साह पाहायला मिळाला. गावातील तरुण देश सेवेसाठी घराबाहेर पडत असल्याने गावासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. याप्रसंगी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा अध्यक्ष गजानन क्षिरसागर, जयंत कुलकर्णी, गोपाल बाविस्कर, प्रनेश क्षिरसागर, योगेश वाणी, सुनील चौधरी, चेतन चव्हाण आदी माणुसकी ग्रुप सदस्य व गावकरी नागरिक मोठ्या उपस्थित होते.

Protected Content