रविवारी खोटे नगर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव, प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव साई सेवा महिला मंडळ व साई मोरया ग्रुप आयोजित ” महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर” रविवार ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात लहान मुलींचे आजार,कावीळ,थायरॉइड, केसांच्या समस्या, जुनाट सर्दी, दमा, त्वचेचे आजार, मानसिक आजार, स्रियांचे आजार, किडनीस्टोन ,मूळव्याध, पचनाचे आजार, हाडांचे आजार, संधीवात, सांधे दुखणे, निद्रानाश इ. तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार गरजू रुग्णांना १० दिवसाची औषधी मोफत देण्यात येईल. मधुमेह (रक्तशर्करा), रक्तदाब व हिमोग्लोबिन तपासणी खोटे नगर स्टॉप जवळील सर्वज्ञ मेडिकल समोर रविवार ८ मार्च रोजी सकाळी ८ ते 2 यावेळेत करण्यात येणार आहे. तपासणी शिबिरास डॉ.रुपाली पाटील, डॉ.प्रज्ञा वानखेडे, डॉ.धनंजय जाधव, डॉ.जितेंद्र जैन, डॉ.संजय जैन, डॉ.मनोज गुजर, सुमनाई हॉस्पिटल, माऊली क्लिनिक, सर्वज्ञ मेडिकल यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. गरजू महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content