गगनाला पंख नवे (ब्लॉग)

स्त्रीचा जन्म हा ! नको घालू सख्या हरी !!
रात्र ना दिवसा ! परक्याची ताबेदारी !!
नाचण्याचा कोंडा ! नाही कशाच्या कामकाजा !!
देऊ नये कधी ! मुलीचा जन्म राम राजा !!

प्राचीन काळी मुलीला जन्म देऊ नये असे म्हणत,पण तीच परिस्थिती सध्या सर्वत्र आढळते.
अलीकडच्या काळात निरागसता कोमजुन जाऊ लागली आहे.

पंख पसरुन गगनात भरारी घेण्याचा वयात डोळ्यांत अमाप स्वप्न घेऊन उडणाऱ्या पक्षिणींची पंख छाटुन टाकल्यावर जशी विव्हळते तशी अवस्था आज स्त्री मनाची होत आहे.समाजातील एका स्त्रीचे दु:ख हे अनेक स्त्रियांचे दु:ख असते.एका स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाने समाजातील अनेक स्त्रियांच्या डोळ्यात अश्रु उभे राहत आहेत. मग ती निर्भया असो वा हिंगणघाट मधील फुलराणी यांच्या नशिबी जे दु:ख आले.त्यास जबाबदार कोण ? तर विकृतीच ना ?

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अनेक समाज सुधारकांनी आवाज उठविला होता.त्यात राजा राम मोहन राँय,महात्मा फुले, आगारकर ,बाबसाहेब आंबेडकर या समाज सुधारकांनी समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.या अश्या चळवळीमध्ये काही अंशी बदल झाला परंतु स्त्रियांचे स्थान दुय्यमचं राहिले.आजही पिडीत स्त्रियांचा अभ्यास करीत असतांना आजही स्त्रियांना भरपूर समस्यांना समोरे जावे लागते आहे.समाजातील स्त्रियांच्या पिळवणुकीला व दुय्यम स्थानाला कायमचा आळा बसणार का ? शेवटी एक असाचं प्रश्न उरतो stop may be or may be not?

स्त्री ही स्वभावातचं घाबरट असल्याने कोणीही तिच्यावर अत्याचार केला.तरी ती आवाज उठविणार नाही.अशी खात्री असं कृत्य करणाऱ्यांना वाटते पण ते परिपुर्ण चुकीचे आहे.स्त्री फक्त ती फक्त समाज उलट आपल्यालाचं दोष देईल.या भितीने गप्प बसते.कारण समाजात नेहमीच स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

थोडक्यात म्हणायचे झाले तर जो पर्यत समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही.तो पर्यत हे स्त्रियांवर होणारे अत्याचार सुरुच राहतील.याला कुठे तरी आळा बसण्यासाठी स्त्रियांनी स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी स्वत:हाचं घेतली पाहिजे.कोणी आपली मदत करेल व आपल्या रक्षणासाठी येईल अशी भ्रामक कल्पना डोक्यातून काढुन टाकावी व अन्यायाचा प्रतिकार करायला शिकावा.

स्त्रियांनी स्त्रीचे अस्तित्व हे समाजाला पटवून दिले पाहिजे.ती भोगण्याची वस्तू नसुन ती सुद्धा एक माणुस आहे.याची जाणीव समाजाला करुन दिली पाहिजे.समाजातील प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एकतरी स्त्री असतेचं ना ! मग आपल्या आयुष्यातं एखादी स्त्री ही आपली आई, बहिण, पत्नी, मुलगी असतेचं ना ! मग त्यांना त्रास दिला कि आपल्याला त्रास होतो ना मग समोरिल स्त्री ही सुद्धा कोणाची आई,बहिण,पत्नी,मुलगी असेलचं ना मग याचा का कोणी काही विचार नाही करत.

हाच विचार आज स्त्री सुरक्षेचा पाया म्हणुन कार्य करेल.समाजात स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्यांच्या मनोवृत्तीत जोवर आमुलाग्र बदल घडत नाही.तोवर ‘ ठेविले अनंते तैसेची राहावे ‘ म्हणत आपला समाज कायम मागे राहिलं.आणि एका अक्षम्य पापाचा धनी राहिल.हे पाप धुवून निघायचे असेल तर हा आणि असाच विचार अनिवार्य आहे.बघा विचार करा.आणि निर्णय घ्या की आपल्याला थोडंफार तरी पुण्य हवं आहे की पापातच जगायचं आहे आयुष्यभर.?

ganesh chaudhari student writer

गणेश प्रमिला शांताराम चौधरी
( बी.एस.सी.रासायनशास्त्र )
एल.एल.बी.प्रथम वर्ष
एस.एस.मणियार विधी महाविद्यालय,जळगाव
पत्ता:- रा.गारखेडा बु.ता.जामनेर जि.जळगाव ४२४२०६
[email protected]

Protected Content