कमलनाथ सरकारवरील संकट तूर्त टळले ; मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित

भोपाळ (वृत्तसंस्था) बहुमत चाचणीवर अडून बसलेल्या भाजपने राज्यपालांच्या अभिभाषणानंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा सभापती एन. पी. प्रजापती यांनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केली. त्यामुळे कमलनाथ काँग्रेसला आपले सरकार वाचविण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी मिळाला आहे.

 

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बहुमच चाचणीची मागणी करण्यात आली. मध्य प्रदेशात राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज विधानसभा सभापती एन. पी. प्रजापती यांनी पहिल्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर बहुमताची पुन्हा मागणी करत भाजपने चांगलाच हंगामा केला. त्यामुळे विधानसभा सदस्यांनी विधानसभा ३६ मार्चपर्यंत स्थगित केली. त्यामुळे काँग्रेसला आपले सरकार वाचविण्यासाठी आता दहा दिवसांचा कालावधी मिळाला आहे.

Protected Content