Home राजकीय मोदींनी त्यांच्या इच्छेनुसार 5 टीकाकारांना लाइव्ह टीव्ही शोमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यावीत :...

मोदींनी त्यांच्या इच्छेनुसार 5 टीकाकारांना लाइव्ह टीव्ही शोमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यावीत : पी चिदंबरम

0
41


modi and chidambaram
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या इच्छेप्रमाणे त्यांचे 5 टीकाकार निवडावे आणि टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्ते द्यावीत, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशभरात आंदोलनावरुन मोदींना सल्ला दिला आहे.

 

चिदंबरम म्हणाले की, ‘मोदींनी आपल्या इच्छेप्रमाणे त्यांचे 5 टीकाकार निवडावे आणि टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्ते द्यावीत. यातून नागरिकांमध्ये या कायद्याबद्दल समज-गैरसमज स्पष्ट होतील. मोदी म्हणतात की, सीएए लोकांना नागरिकत्व देते. पण, अनेक लोकांना वाटते की यामुळे त्यांचे नागरिकत्व जाणार आहे. आमची अशी इच्छा आहे की, मोदींना माध्यमांसमोर यावे आणि देशातील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, आशा करतो की, मोदी माझ्या या सल्ल्याला ऐकतील,असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound