आम आदमी पार्टीच्या जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे चोपड्यात उद्घाटन

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आम आदमी पार्टी राज्यासह जळगाव जिल्ह्यात विस्ताराने वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन चोपडा तालुक्यातील चहार्डी या गावी मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले.

आम आदमी पार्टीच्या जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक तुषार निकम यांच्या हस्ते करण्यात आले .सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपसंयोजक प्रा. गणेश पवार ,जिल्हा उपसंयोजक विठ्ठलराव साळुंखे, जिल्हा सचिव डॉ महेश पवार यांसह एरंडोल तालुका संयोजक एन के पाटील अमळनेर येथील रामकृष्ण देवरे, प्रमोद पाटील ( जळगाव ) आदी मान्यवर उपस्थित होते.

आम आदमी पक्ष शिक्षण, निवारा, वीज, सरकारी नोकऱ्या, शेतकरी – शेतमजूर व शेती , इत्यादी विषयांना प्राधान्य देऊन जनतेसाठी सातत्याने कार्य करीत आहे आणि या विषयांच्या माध्यमातून दिल्ली व पंजाब या दोन राज्यात सत्ता मिळवल्यानंतर गुजरात देखील काबीज करणार आहे आणि येणाऱ्या २०२४ मध्ये महाराष्ट्रात देखील आम आदमी पक्ष स्वबळावर संपूर्ण जागा लढवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे .या पार्श्वभूमीवर राज्यातील , जिल्ह्यातील ,तालुक्यातील प्रत्येक गावात व वार्डात आम आदमी पक्षाची शाखा असावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चोपडा तालुक्यातील चहार्डी या गावी जळगाव जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात संपूर्ण जिल्हाभर गावोगावी शाखा उघडतील असे यावेळी जिल्हा संयोजक तुषार निकम यांनी सांगितले.

चहार्डी गावाच्या शाखा संयोजक पदी सिताराम वसंत पाटील, उपसंयोजक पदी दिनकर भाईदास पाटील ,सचिव प्रकाश रघुनाथ सोनवणे, कोषाध्यक्ष गोविंद लालचंद कोळी ,खजिनदार अनिल मधुकर महाजन यांची निवड करण्यात आली आहे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश केला.

सर्वप्रथम कालिका माता मंदिरात नारळ चढवून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तदनंतर महादेव मंदिर चौकात जाहीर सभा देखील घेण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंदराव पाटील, सिताराम पाटील, आर.डी.पाटील, सुधीर पाटील, समाधान बाविस्कर, रामचंद्र भालेराव, हिम्मत मोरे आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content