ना. गिरीश महाजन यांनी महाकुंभ तयारीची केली पाहणी

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोदरी या गावामध्ये बंजारा व लबाना नायगडा समाज महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाकुंभाच्या तयारीची पाहणी आज ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केली.

 

आगामी २५  जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान होणाऱ्या बंजारा व लबाना नायगडा समाज महाकुंभाची तयारी जोरदार सुरू आहे.  गोदरी या गावात व   आजूबाजू परिसरातील सुमारे ३००  ते ४००  एकर जमीनवर या महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. मशिनच्या सहाय्याने काम करण्यात येत आहे.  त्याचबरोबर गोदरी गावातील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची पाहणी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. त्याचबरोबर महाकुंभ बाबत आढावा घेतला.  यावेळी त्यांच्यासोबत परमपूज्य श्याम चैतन्य जी महाराज, रामेश्वर नाईक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी किरण पाटील, अमित देशमुख, आर. डी. पाटील, अभियंता पीडब्ल्यूडी जामनेर, मनोज पाटील शाखा अभियंता जामनेर, निलेश चव्हाण ,दिनेश गोडंबे ,बबलू भन्साली, रवींद्र चौधरी, युवराज पाटील, उत्तम राठोड, भगवान मंझा, नितू ठाकूर, बद्री शेठ चौधरी, शिवा गोडंबे, निलेश चव्हाण, अक्षय जाधव, विश्वनाथ चव्हाण, भरत राठोड, प्रवीण राठोड, गबरू नाईक, मुरार सिंगप्ले, शांताराम मनजावत, भागचंद साबळे यांच्यासह महाकुंभ समिती पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content