शौर्य दिनाच्या अनुषंगाने सावद्यात विविध उपक्रमांचं आयोजन

सावदा प्रतिनिधी | शौर्य दिनानिमित्त सावदा शहरातील विविध संस्था, संघटना आणि सामाजिक पक्षांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सजविण्यासाठी अशोक वृक्ष, विविध प्रकारच्या फूलझाड़ासह रंग-बिरंगी विद्युत रोषणाई यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर शहरवासीयांचे आकर्षण ठरत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संपूर्णपणे तयारी ही प्रियदर्शी फॉउंडेशनच्या माध्यमातून केली जात आहे. ज्या भीम अनुयायांना अभिवादनासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाता येणार नाही. अश्या लोकांनी सावदा येथे अभिवादन करावे. यासाठी संस्थेच्या माध्यमातून २५ फूटी विजयीस्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तरी परिसरातील भीम अनुयायांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे संचालक चेतन लोखंडे यांनी केले आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या अनुषंगाने दि. १ जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान सावदा शहर व परिसरातील भीम अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यात शहरासह परिसरातील भीमसैनिकांचा समावेश आहे़. सावदा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा परिसरात जमतात़. शुक्रवारी रात्रीपासूनच पुतळा परिसरात भीमसैनिक विजयस्तंभास मानवंदना करण्यासाठी व युगपुरुषास अभिवादनासाठी आले होते. शौर्य दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना, सामाजिक पक्षांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन दिनानिमित्त विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संपूर्णपणे तयारी करण्यात आली आहे़. पुतळा परिसर सजावट, मंडप उभारणी, बगीचा फुलविणे, विद्युत रोषणाई आदी तयारी पूर्ण करण्यात आली असून यामुळे पुतळा परिसर खुलून गेला आहे़. संपूर्ण सावदेकरांचे लक्ष वेधून घेईल, अशी सजावट करण्यात आल्याची माहिती प्रियदर्शी फॉउंडेशनचे संचालक सचिन लोखंडे यांनी दिली़

“आम्ही 12 तरुणांनी मिळून या सजावटीसाठी हार बनविले आहेत़. बुधवार दिवसभर व रात्रभर वृक्षासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू होते़. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सजावटीस सुरुवात झाली़. डॉ़ आंबेडकर पुतळा परिसरात कोपरान् कोपरा सजावटीने फुलून गेला आहे़. यंदा सजावटीसाठी आणण्यात आलेली काही वृक्ष झाडे शोभेची आणली आहेत़” असे प्रियदर्शी फाउंडेशनच्या अध्यक्षा अनोमदर्शी तायडे यांनी सांगीतले.

या उपक्रमासाठी प्रियदर्शी फॉउंडेशन सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केले़. यात विकास लोखंडे, चेतन लोखंडे, सचिन लोखंडे, संजय लोखंडे, करण साळुंके, विशाल पुर्भि, योगेश बोदडे, सचिन मेढ़े, रितेश भारुडे,प्रतिक लोखंडे, करण सोनवणे, हितेश तायडे, सिद्धार्थ लोखंडे, चंद्रकांत लोखंडे, योगेश पुर्भि,स्वप्निल तायडे यांनी गुरुवारी दिवसभर पुतळा सजावटीचे काम केले़. सकाळी ११ वाजता सुरू झालेली सजावट रात्री अकरा वाजता संपली़. या सजावटीसाठी शहरातील नामांकित वकील अँड राजकुमार लोखंडे यांचेही योगदान लाभले. सजावट चालू असताना येणाऱ्या प्रत्येक भीम अनुयायाने सजावटीसाठी मदत व सहकार्य केले.

Protected Content