शिवशाही बसवर अज्ञाताकडून दगडफेक; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव घाट येथे शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याची घटना शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव आगाराची शिवशाही (बस क्रमांक एमएच १८ बीजी ८७१) ही औरंगाबाद येथून जळगाव कडे येत असतांना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फोडला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहतक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८) रा. हिंगोणा ता. चोपडा यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफुर तडवी करीत आहे.

Protected Content