अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षांकरीता ३ महिने १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी अटी पुढील प्रमाणे –

१) उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक)

२) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

३) उमेदवार हा शालांत परिक्षा (१० वी) उत्तीर्ण असावा.

४) उमेदवार हा १८ वर्ष पुर्ण असावा.

५) शाळा सोडल्याचा दाखला

६) १० वी, १२ वी, पदवी (शैक्षणिक पात्रता) गुणपत्रिका

७) आधार कार्ड

८) बॅक पासबूक

९) दोन पासपोर्ट साईज फोटो

१०) जातीचा दाखला

वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडुन विविध शासकीय/निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु.१०००/- विद्यावेतन व प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ४ पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येते.

प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता मुलाखत दिनांक – २९/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० पासुन आहे. सदर दिवशी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहीतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र. ०२५८४-२५१९०६ किंवा मोबाईल क्रमांक ८६६८८१७८९३ ( अमिन तडवी, कनिष्ठ कौशल्य विकास,रो.व.उ.मा.अधिकारी) या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.